१५ ऑगस्ट रोजी भारताने ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यानिमित्त संपूर्ण देशात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलिब्रेटींनीही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्वीट, पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनेही स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देणारी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलीये. तिने ‘ये मेरे वतन’ या गाण्यावर कथ्थक करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा परफॉर्मन्स चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमधून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
Snehalvo
#UrmilaKothare #IndependenceDay #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber